Happy Seeder: शून्य मशागतीसाठी हॅपी सीडर; काडीकचरा न जाळता थेट पेरणीचा स्मार्ट पर्याय

Swarali Pawar

शून्य मशागतीचा नवा साथीदार!

काडीकचरा न जाळता थेट पेरणी करायची असेल तर हॅपी सीडर उपयुक्त ठरतो. यामुळे खर्च कमी होतो आणि जमिनीचे आरोग्यही टिकून राहते.

Direct Seeding Machine | Agrowon

हॅपी सीडर म्हणजे नेमकं काय?

हॅपी सीडर हे ट्रॅक्टरचलित आधुनिक पेरणी यंत्र आहे. हे यंत्र काडीकचऱ्यामध्ये थेट बियाणे आणि खत पेरू शकते.

Direct Seeding Machine | Agrowon

कोणत्या ट्रॅक्टरला जोडते?

हे यंत्र चालवण्यासाठी किमान ३५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. यामध्ये ७, ९ किंवा ११ फण्यांचे पेरणी यंत्र उपलब्ध असते.

Direct Seeding Machine | Agrowon

काडीकचऱ्यात पेरणी कशी होते?

यंत्रातील फिरते ब्लेड काडीकचरा बाजूला सारतात. त्यानंतर बियाणे योग्य खोलीवर पेरले जाते.

Direct Seeding Machine | Agrowon

नैसर्गिक आच्छादनाचा फायदा

पेरणीनंतर काडीकचरा पुन्हा बियाण्यावर पसरवला जातो. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Direct Seeding Machine | Agrowon

काडीकचरा जाळण्याची गरज नाही

हॅपी सीडरमुळे पीक अवशेष जाळावे लागत नाहीत. यामुळे प्रदूषण कमी होते आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

Direct Seeding Machine | Agrowon

जमिनीची सुपीकता वाढवणारे तंत्र

पीक अवशेष कुजून जमिनीत मिसळतात आणि अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता सुधारते.

Direct Seeding Machine | Agrowon

खर्च वाचवा, ओलावा टिकवा

नांगरणी आणि मशागतीचा खर्च कमी होतो. कमी पावसाच्या काळातही ओलावा टिकून राहिल्याने पिकाची वाढ चांगली होते.

Direct Seeding Machine | Agrowon

Soil Type: जमिनीच्या प्रकारानुसार निवडा योग्य पीक; उत्पादन वाढवण्याचा स्मार्ट फॉर्म्युला

Agrowon
अधिक माहितीसाठी..