sandeep Shirguppe
आपल्या रोजच्या आहारात मीठ आणि साखरेवर करण्यात आलेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मीठ आणि साखरेत प्लॉस्टिक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 'टॉक्सिक्स लिंक' या पर्यावरण संशोधन संस्थेनं याबाबत रिसर्च केला होता.
भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत.
'टॉक्सिक्स लिंक' या संस्थेला संशोधनात सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक असल्याचं निदर्शनास आले.
या मायक्रोप्लास्टिकचा आकार ०.१ मिलीमीटर (मिमी) ते ५ मिमी पर्यंत असल्याचे निदर्शनास आले.
साखर आणि मीठ यामधील मायक्रोप्लास्टिक असल्याचा अहवाल आज 'टॉक्सिक्स लिंक'ने प्रसिद्ध केला.
मानवी आरोग्यावर मायक्रोप्लास्टिक्सचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे यावर तातडीने आणि व्यापक संशोधनाची गरज आहे.
साखरेत मायक्रोप्लास्टिकची कॉन्सेंट्रेशन ११.८५ ते ६८.२५ तुकडे प्रति किलोग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.
मायक्रोप्लास्टिक ही वाढती जागतिक चिंता आहे, कारण ते आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही हानी पोहोचवू शकतात.