Swarali Pawar
पॉलिथिन आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्ये, पाणी आणि प्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतात.
तणनियंत्रणासाठी मजूर लावण्याची गरज कमी होते. त्यामुळे शेतीतील मजुरी खर्चात मोठी बचत होते.
आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. कमी पाण्यातही उन्हाळ्यात दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेणे शक्य होते.
आच्छादनामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. दिलेली खते पिकांच्या मुळांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात.
उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि हिवाळ्यात तापमान खूप कमी होत नाही. यामुळे पिकांची वाढ सुरळीत राहते.
आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहते. यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.
भाज्यांचा मातीशी थेट संपर्क होत नाही, त्यामुळे त्यांचा रंग व आकार आकर्षक राहतो आणि बाजारात चांगला भाव मिळतो.
आच्छादनापूर्वी सॉइल सोलरायझेशन केल्याने जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होतात. मातीची रचना आणि पोषकतत्त्वांची उपलब्धता सुधारते.