Swarali Pawar
मावा कोवळ्या फांद्यांवर वसाहत करून रस शोषतो व पाने आक्रसवतो. निंबोळी अर्क फवारणी व पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर मावा नियंत्रणात मदत करतो.
तुडतुडे पानांतून रस शोषून विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे पाने गळतात. पिवळे चिकट सापळे लावणे आणि वेळेवर कीटकनाशक फवारणी करणे उपयुक्त ठरते.
फुलकिडे फुलोऱ्यात नुकसान करून शेंगांची वाढ खुंटवतात. निळे चिकट सापळे आणि निंबोळी अर्क फवारणीने त्यांचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
पांढरी माशी पाने पिवळी करते व येलो मोझॅक व्हायरस पसरवते. चिकट सापळे, निंबोळी अर्क आणि ॲझाडिरॅक्टीन फवारणीने तिचे नियंत्रण करता येते.
स्फिंजीड, हेलिकोव्हर्पा व शेंगा पोखरणाऱ्या अळ्या पाने व शेंगा खातात. अळ्यांचा प्रादुर्भाव दिसताच जैविक किंवा रासायनिक उपाय करावेत.
शेतात २०-२५ ठिकाणी पाहणी करून २-३ अळ्या प्रतिमीटर ओळीला आढळल्यास तातडीने उपाय करावेत. नियमित सर्वेक्षणाने किड नियंत्रण सोपे होते.
तण नियंत्रण, खत संतुलन, कामगंध सापळे आणि मित्रकीटकांचे संवर्धन हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक आहेत. रासायनिक फवारणी फक्त आवश्यकतेनुसार करावी.
आर्थिक नुकसान पातळी गाठल्यावर लेबल क्लेमनुसार कीटकनाशके आलटून-पालटून वापरावीत. फवारणी करताना वेळ, प्रमाण आणि पिकाची अवस्था लक्षात घ्यावी.