Anuradha Vipat
काही झाडं घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि घरातली हवा चांगली राहते असं मानलं जातं.
तुळस ही एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि ती घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं.
चंदन हे सुगंधित आणि मन शांत करणारे झाड आहे. घरात चंदन ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं.
लिंबूचं झाड घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं.
शमीचं झाड शनिदेवाशी संबंधित आहे आणि घरात ते ठेवल्याने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो
मनी प्लांट घरात ठेवल्याने आर्थिक वृद्धी होते असं मानलं जातं.
बेलपत्र हे शंकराला प्रिय आहे. घरात बेलपत्र लावल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.