Swarali Pawar
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे अनेक भाजीपाला पिके घेणे कठीण होते. अशा वेळी दुधीभोपळा हे कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारे पीक ठरते.
दुधीभोपळ्यासाठी मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमिनीत पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
उन्हाळी हंगामासाठी दुधीभोपळ्याची पेरणी जानेवारी ते मार्च दरम्यान करावी. योग्य वेळेत पेरणी केल्यास वेलांची वाढ चांगली होते.
दुधीभोपळ्यासाठी सम्राट ही सुधारित जात चांगले उत्पादन देणारी आहे. लागवडीसाठी हेक्टरी साधारण २ ते २.५ किलो बियाणे लागते.
मंडप पद्धतीने लागवड करताना ३ × १ मीटर अंतर ठेवावे. जमिनीवर लागवड करताना ५ × १ मीटर अंतर ठेवणे योग्य ठरते.
लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी ५०:५०:५० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावे. त्यानंतर ३० आणि ४५ दिवसांनी नत्र खताचे दोन हप्ते द्यावेत.
फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी पानातील रस शोषून पिकाचे नुकसान करतात. नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारणी आणि कामगंध सापळे वापरावेत.
दुधीभोपळा पीक साधारण १८० ते २०० दिवस उत्पादन देत राहते. योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टरी ४० ते ५० टन उत्पादन मिळू शकते.