Buffalo Summer Care: उन्हाळ्यात म्हशींची काळजी कशी घ्यावी?

Swarali Pawar

काळजी का महत्त्वाची?

उन्हाळ्यात तापमान खूप वाढते आणि त्याचा म्हशींच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून या काळात योग्य काळजी घेतली तर उष्णतेचा त्रास कमी होतो.

Buffalo Farming Tips | Agrowon

उष्णतेचा त्रास

म्हशींच्या कातडीत घामग्रंथी कमी असतात तसेच त्यांची काळी कातडी सूर्यप्रकाश जास्त शोषते आणि शरीराचे तापमान वाढते.

Buffalo Farming Tips | Agrowon

पाण्यात बसण्याची व्यवस्था

म्हशींना पाण्यात बसणे किंवा डुंबणे खूप आवडते. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान कमी राहते आणि त्यांना थंडावा मिळतो.

Buffalo Farming Tips | Agrowon

पाण्याने अंघोळ

उन्हाळ्यात दिवसातून ३–४ वेळा म्हशींना थंड पाण्याने धुवावे. शक्य असल्यास त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे पडतील अशी व्यवस्था करा.

Buffalo Farming Tips | Agrowon

सावलीची व्यवस्था

दुपारच्या कडक उन्हात म्हशींना गोठ्यात किंवा झाडांच्या सावलीत ठेवावे. गोठा हवेशीर असावा आणि त्यात जास्त गर्दी करू नये.

Buffalo Farming Tips | Agrowon

भरपूर पाणी

उन्हाळ्यात म्हशींना वारंवार पाणी पिण्याची गरज असते. त्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्या.Buffalo Farming Tips

Buffalo Farming Tips | Agrowon

माजावर लक्ष

उन्हाळ्यात म्हशींच्या माजाची लक्षणे कमी दिसू शकतात. म्हणून दिवसातून ३–४ वेळा जनावरांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.

Buffalo Farming Tips | Agrowon

उष्माघातापासून संरक्षण

जास्त उष्णता, पाण्याची कमतरता किंवा गोठ्यातील गर्दीमुळे उष्माघात होऊ शकतो. योग्य व्यवस्थापन केल्यास म्हशी निरोगी राहतात आणि दूध उत्पादन टिकते.

Buffalo Farming Tips | Agrowon

Spinach Cultivation: उन्हाळ्यात पालक लागवड, कमी कालावधीत मिळवा भरघोस उत्पादन!

अधिक माहितीसाठी...