Swarali Pawar
सापळा पिके कीड नियंत्रण करतात व रासायनिक फवारणी कमी करतात. मुख्य पिकांचे उत्पादन सुरक्षित राहते.
कीटकनाशके कमी, पिकांचे संरक्षण वाढते. मित्र कीटक आणि नफा दोन्ही वाढतात.
झेंडू मावा व सूत्रकृमींना आकर्षित करतो. मधमाश्यांना आकर्षित करून परागीभवन वाढवतो.
मोहरी मावा व रसशोषक किडींना खेचते. कोबी, मिरची, सूर्यफूल पिकांचे रक्षण करते.
तूर मित्र कीटकांसाठी आश्रयस्थान आहे. हे कीटक हानिकारक किडींवर नियंत्रण ठेवतात.
गाजराची फुले मित्र कीटकांना आकर्षित करतात. परागीभवन वाढवून कीड नियंत्रणात मदत करतात.
मका पक्षी व उपयुक्त कीटकांना आकर्षित करतो. पक्षी अळ्या खाऊन कीड नियंत्रण करतात.
सापळा पिके म्हणजे नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण करणे शाश्वत शेतीसाठी ही पद्धत नक्की वापरा!