Aslam Abdul Shanedivan
किचन गार्डनिंग ही आता लोकांची गरज आणि छंद बनत चालली आहे. वाढणाऱ्या भाज्यांच्या दरामुळे अनेक लोक हे घरातच भाजीपाला लावत आहेत.
घरातच भाजीपाला उपलब्ध झाल्याने पैसे वाचत आहेत. तर फेब्रुवारी महिना भाजीपाला लागवडीसाठी उत्तम मानला जातो.
विशेष म्हणजे लवकर उत्पादन देणाऱ्या वाणांची पेरणी फेब्रुवारीतच केल्यास भाजीपाला लवकर तयार होतो. मग या भाज्या कोणत्या हे जाणून घेऊ
भेंडी ही अतिशय लोकप्रिय भाजी असून ती फेब्रुवारी महिना भेंडीसाठी खूप चांगला आहे. भेंडी फेब्रुवारी-एप्रिल, जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा तीन महिन्यात लावता येते
फेब्रुवारी महिन्यात तुम्ही बागेत कारल्याच्या बिया लावा. बियाणे पेरल्यानंतर १० ते १५ दिवसांत उगवतात. योग्य काळजी घेतल्यास दोन महिन्यांनंतर तुम्ही कारल्याची काढणी करू शकता.
फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमच्या बागेत हिरव्या मिरचीचे रोप लावू शकता. चिकणमाती माती यासाठी सर्वोत्तम मानली जाते.
दुधीभोपळ्याची लागवड घरी सहज करता येते. कुंडीत किंवा बागेत पेरणीपूर्वी २४ तास दुधीभोपळ्याच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा. फेब्रुवारी महिना दुधीभोपळ्याच्या उत्पादनासाठी चांगला मानला जातो.