Onion : कांदा वाळला, मग तो शेतातील जमिनीवर का सोडू नये? काय होते नुकसान?

Aslam Abdul Shanedivan

कांद्याला मागणी

भारतात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये कांद्याला अधिक महत्त्व असून कांद्याला बाजारात नेहमीच मागणी असते.

Onion | Agrowon

खरीप आणि रब्बी

खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतात. कांद्यामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म देखील आढळतात.

Onion | Agrowon

शेतकऱ्यांना अडथळ्यांचा सामना

मात्र, खराब हवामान आणि महागाईमुळे कांदा लागवडीतही शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

Onion | Agrowon

कांदा नाशवंत पिक

दरम्यान कांदा हा नाशवंत पिक असल्याने त्याकडे शेतकऱ्यांना अधिक लक्ष द्यावे लागते. त्यासाठी त्यांना कांदा वाळवावा लागतो.

Onion | Agrowon

कांदा साठवण

कांद्याची काढणी केल्यानंतर तो साठवणूकीच्या आधी काही मूलभूत नियमांचे पालन करावे लागते.

Onion | Agrowon

कांदा शेतात

कांदा तयार झाला हे त्याच्यावरचे पापूद्रे वाळून पडल्यावर समोर येते. त्यावेळी ते वाळण्यासाठी एक आठवडा किंवा दहा दिवस शेतात टाकला जातो.

Onion | Agrowon

बुरशी आणि कुजणे

पण यापेक्षा अधिक जास्त दिवस शेतात टाकल्यास ते मातीतून पसरणाऱ्या रोगांना कांदा बळी ठरू शकतो. तर स्टोरेज दरम्यान बुरशी आणि कुजणे यासारखे रोग होऊ शकतात.

Onion | Agrowon

Goat Farming : मुक्त संचार गोठ्यात शेळीपालन करावे का?