Swarali Pawar
रेशीम शेतकरी गटातून एकरी ३.५५ लाख तर पोक्रा योजनेतून एकरी २.२९ लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. यामुळे तुती लागवड फायदेशीर ठरते.
तुतीच्या लागवडीसाठी व्ही-१, एस-३६, जी-२ आणि एस-५४ वाण उपयुक्त आहेत. तसेच एम-५ व्ही-१ या कलमाचा वापर करावा.
तुती लागवडीसाठी हलकी, मध्यम ते भारी व पाणी निचरा होणारी जमीन योग्य आहे. जमिनीचा सामू ६.५ ते ७.२५ दरम्यान असावा.
हलक्या जमिनीत खड्डा किंवा सरी पद्धत, तर भारी जमिनीत जोड ओळ पद्धती वापरावी. जमिनीच्या प्रकारानुसार ६०x६० सें.मी. ते ९०x९० सें.मी. अंतर ठेवावे.
लागवडीपूर्वी शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खत द्यावे. दुसऱ्या वर्षापासून ३५०:१४०:१४० प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश रासायनिक खत पाच हप्त्यांत द्यावे.
तुती बागेला एकरी १.५ एकर इंच पाणी द्यावे. १०–१५ दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात. ठिबक सिंचनाने ३०% पाण्याची बचत करता येते.
तुतीचे पीक कमरेच्या उंचीपर्यंत आंतरमशागत करावी. त्यानंतर तण कमी वाढते व किडींचा त्रास तुलनेने कमी असतो.
एक हेक्टर तुती बागेतून दरवर्षी ३०,००० कि.ग्रॅ. पाला मिळतो. तो ८००–१२०० कि.ग्रॅ. रेशीम कोष उत्पादनासाठी पुरतो. एकदा लागवड केल्यावर १५ वर्षे पाने मिळतात.