Aloe Vrea Cultivation : अशी करा औषधी कोरफडीची लागवड

Team Agrowon

कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन लागवडीस योग्य असते. उष्ण, दमट व कोरड्या हवामानात पिकाची वाढ चांगली होते.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः १.५ ते २.५ फुटापर्यंत वाढते. पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी २५ ते ३० सेंमी तर जाडी ३ ते ४ सेंमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

लागवड १.५ बाय १.५ फूट किंवा २ बाय २ फूट अंतरावर करावी. लागवडीसाठी हेक्टरी १० ते १८ हजार कंद आवश्‍यक आहेत.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र ३५ किलो, स्फुरद ७० किलो व पालाश ७० किलो द्यावे. लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी ३५ ते ४० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी.

Aloe Vrea Cultivation | Agrowon

कोरफडीपासून प्रतिवर्षी हेक्टरी ११० ते ११५ क्विंटल हिरवी पाने मिळतात.

Aloe Vrea Cultivation | Agrowon