Karvand Cultivation : शेताभोवती कुंपण म्हणून लागवड करा करवंदाची

Team Agrowon

हलक्या, मुरमाड, डोंगरी भागात कमी खर्चामध्ये येणारे पीक म्हणून शेतामध्ये किंवा बांधावर करवंद लागवड करावी.

Karvand Cultivation | Agrowon

करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय फळपीक आहे.

Karvand Cultivation | Agrowon

शेताभोवती करवंदाची सजीव कुंपण म्हणून लागवड केल्यास मुख्य पिकाव्यतिरिक्त अधिक उत्पन्न मिळण्याबरोबर जंगली किंवा मोकाट प्राण्यांपासून शेताचे संरक्षण होते.

Karvand Cultivation | Agrowon

उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानात योग्य वाढ होते. मुसळधार पाऊस आणि पाणी साचलेली जमीन फळपिकास उपयुक्त नाही.

Karvand Cultivation | Agrowon

लागवड वालुकामय चिकण माती, जांभा, वाळू व काळी माती असलेल्या जमिनीमध्ये केली जाते. खडकाळ, मुरमाड, पडीक, कातळ आणि हलक्या जमिनीत सुद्धा चांगले वाढते. या पिकास पाण्याची गरज खूप कमी आहे. परंतु नव्याने लावलेल्या झाडांना पाणी द्यावे.

Karvand Cultivation | Agrowon

करवंदाची कोकण बोल्ड ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागवडीसाठी याची शिफारस आहे. केंद्रीय शुष्क प्रदेशीय संशोधन संस्थेने मरू गौरव ही नवीन व जास्त उत्पादनक्षम जात विकसित केली आहे. 

Karvand Cultivation | Agrowon

तीन वर्षांनी बागेपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. झाड जसजसे मोठे होत जाईल, तसतशी उत्पादनात वाढ होते.

Karvand Cultivation | Agrowon

Onion Processing : वाळलेल्या कांद्यापासून कोणते पदार्थ तयार होतात?