Swarali Pawar
पावसाचा खंड आणि वाढत्या तापमानामुळे सोयाबीनमध्ये मूळकुजचा धोका वाढतोय.
फुलोरा आणि शेंगांच्या अवस्थेत पिकाची विशेष काळजी घ्या.
मूळकुज झाल्यास पाने पिवळी पडून झाड कोमेजते आणि वाळू लागते. झाड उपटल्यावर मुळे तपकिरी-काळी होऊन त्यावर बारीक काळे ठिपके दिसतात.
पाऊस नसल्यास आणि पाणी उपलब्ध असल्यास जमिनीतील ओलावा पाहून हलके सिंचन करा. फुलोरा, शेंगा लागणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका.
जमिनीत मोठ्या भेगा पडल्यास हलकी आंतरमशागत करून त्या बुजवा. फुलोरा आणि शेंगा लागल्यानंतर मात्र खोल आंतरमशागत टाळा.
शेताची दर दोन ते तीन दिवसांनी पाहणी करून अचानक कोमेजलेली झाडे तपासा. रोगग्रस्त झाडे मुळासह काढून शेताबाहेर सुरक्षितपणे नष्ट करा.
रोगग्रस्त भागात ट्रायकोडर्माची आळवणी केल्यास रोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र पूर्णपणे वाळलेले झाड पुन्हा बरे होत नाही.
पाणी साचणे, अन्नद्रव्यांची कमतरता, खोडकिडा किंवा तणनाशकाची इजेमुळेही पाने पिवळी पडू शकतात. म्हणून झाड उपटून मुळे आणि खोड तपासल्यानंतरच रोग निश्चित करा.
पाण्याचा आणि उष्णतेचा तीव्र ताण येऊ न देणे हाच मूळकुज रोखण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. वेळीच पाहणी, योग्य ओलावा आणि रोगट झाडांचे व्यवस्थापन करा.