Fruit Crop Cultivation : अशा जमिनीत करा नविन फळबागेची लागवड

Team Agrowon

फळबाग लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजन करावे.

Fruit Crop Cultivation | Agrowon

फळबागेकरिता उत्तम निचऱ्याची ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी.

Fruit Crop Cultivation | Agrowon

जमिनीचा उतार २ किंवा ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. ज्या जमिनीचा उतार १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी टप्पे करुन ठिबक सिंचन पद्धत वापरुन लागवड करावी.

Fruit Crop Cultivation | Agrowon

जमिनीचा उतार दक्षिण - पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते. कारण अशा ठिकाणी हवा उष्ण आणि कोरडी राहते.

Fruit Crop Cultivation | Agrowon

पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल - मे मध्ये फळझाडीसाठी शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरुन घ्यावेत.

Fruit Crop Cultivation | Agrowon

ज्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होत नाही, अशा जागेत कोणतेच फळझाड येत नाही. भारी, मध्यम व हलकी असा जमिनीचा प्रकार पाहून त्यानुसार फळझाडांची निवड करावी.

Fruit Crop Cultivation | Agrowon