Anuradha Vipat
तुमच्याकडे जर एखादे सुंदर गुलाबी ब्लाऊज असेल तर ते तुम्ही खालील रंगांच्या साड्यांवर नक्कीच ट्राय करू शकता.
नेव्ही ब्लू किंवा रॉयल ब्लू साडीवर राणी गुलाबी रंगाचे ब्लाऊज खूपच रॉयल आणि उठावदार दिसते.
काळया रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज एक फ्रेश आणि ग्लॅमरस लूक देते.
ऑफिस वेअर किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी तुम्ही ग्रे साडीवर फिकट गुलाबी ब्लाऊज घालू शकता.
लग्नसमारंभासाठी बॉटल ग्रीन साडी आणि त्यावर गुलाबी सिल्क ब्लाऊज अतिशय पारंपरिक आणि सुंदर दिसते.
पांढऱ्या साडीवर गुलाबी ब्लाऊज एक नाजूक आणि सुंदर लूक देते.
पिवळा आणि गुलाबी कलर हळदीच्या कार्यक्रमात किंवा सणासुदीला खूप छान दिसतात.