Anuradha Vipat
अननस हे फळ चवीला जितके चविष्ट आहे, तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीरही आहे.
अननसात 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते, जे प्रथिने पचवण्यास मदत करते.
यामध्ये 'व्हिटॅमिन सी' भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते
अननसामुळे शरीराची जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
अननस चवीला आंबट-गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखर आणि ॲसिडचे प्रमाण जास्त असते.
रिकाम्या पोटी जास्त अननस खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते.
अनेकदा अननस खाल्ल्यावर जिभेला किंवा ओठांना खाज येते किंवा जीभ सळसळते. हे त्यातील 'ब्रोमेलेन'मुळे होते.