Anuradha Vipat
मुळव्याध या समस्येवर सुरुवातीच्या टप्प्यात घरगुती उपचार आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून उत्तम नियंत्रण मिळवता येते.
कोमट पाण्याने टब भरा. त्यात १० ते १५ मिनिटे बसा. यामुळे गुदद्वाराची सूज आणि वेदना लगेच कमी होतात.
शुद्ध कोरफडीचा गर बाधित भागावर लावा. यातील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे खाज आणि जळजळ थांबते.
शौचाच्या ठिकाणी शुद्ध खोबरेल तेल लावा. यामुळे तो भाग मऊ होतो आणि शौचास साफ होण्यास मदत होते.
रोज जेवणानंतर एक ग्लास ताकात थोडे जिरे आणि ओवा पूड टाकून प्या.
आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळांचा समावेश करा. यामुळे मल मऊ होतो.
दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. पाणी शरीरातील कचरा बाहेर टाकण्यास आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत करते.