Katachi Amti Recipe : पुरणपोळीच्या सोबत बनवली जाणारी झणझणीत कटाची आमटी कशी बनवावी?

Anuradha Vipat

परंपरा

महाराष्ट्रात पुरणपोळीच्या बेतासोबत झणझणीत आणि चमचमीत कटाची आमटी बनवणे ही एक परंपरा आहे.

Katachi Amti Recipe | agrowon

चवदार आमटी

पुरणपोळीसाठी चणा डाळ शिजवल्यानंतर जे उरलेले पाणी असते, त्याला 'कट' म्हणतात. याच कटापासून ही चवदार आमटी बनवली जाते.

Katachi Amti Recipe | agrowon

साहित्य

कटाचे पाणी, सुके खोबरे , कांदा, खसखस, लसुण पाकळ्या, आले, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, हिंग,चमचा हळद, कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला , धणे पूड, चवीनुसार मीठ, थोडा गूळ.

Katachi Amti Recipe | agrowon

कृती

भाजलेला कांदा, खोबरे, खसखस, आले, लसूण आणि कोथिंबीर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्या.

Katachi Amti Recipe | agrowon

आमटीला फोडणी देणे

२-३ चमचे तेल गरम करा . त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. यात तयार केलेले वाटण टाका. मसाला मंद आचेवर चांगला परतून घ्या. मसाला परतल्यावर त्यात हळद, धणे पूड आणि कांदा-लसूण मसाला घालून १ मिनिट परता.

Katachi Amti Recipe | agrowon

कट आणि डाळ

मसाल्याला तेल सुटले की, त्यात चणा डाळीचे पाणी ओता. आवडीनुसार आमटी पातळ किंवा घट्ट ठेवण्यासाठी थोडे कोमट पाणी वाढवू शकता.

Katachi Amti Recipe | agrowon

उकळी काढणे

आमटीमध्ये चवीनुसार मीठ आणि छोटा खडा गूळ टाका. आमटीला मध्यम आचेवर छान १० ते १२ मिनिटे उकळू द्या. शेवटी वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर भुरभुरा. तुमची गरमागरम, झणझणीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कटाची आमटी तयार आहे!

Katachi Amti Recipe | agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...