Anuradha Vipat
वास्तुशास्त्र आणि विज्ञानानुसार खालील काही गोष्टी कधीही दुसऱ्याला देऊ नयेत किंवा वापरू देऊ नयेत.
कोणाचे घड्याळ उधार घेतल्यास किंवा दिल्यास त्याचा तुमच्या प्रगतीवर आणि नशिबावर परिणाम होतो.
बोटातील अंगठी ही तुमच्या ग्रहांशी जोडलेली असते. ती दुसऱ्याला घालण्यास दिल्यास तुमच्या जीवनातील ऊर्जेत अडथळा येऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार, पेन दिल्याने तुमची आर्थिक प्रगती किंवा नशीब दुसऱ्याकडे जाऊ शकते.
घरातील झाडू कधीही दुसऱ्याला देऊ नये, यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते अशी मान्यता आहे.
सूर्यास्तानंतर कोणालाही मीठ देऊ नये. यामुळे घरातील आर्थिक बरकत संपते.
तुमची रोजची अभ्यासाची पुस्तके दीर्घकाळ दुसऱ्याला देणे टाळावे यामुळे तुमच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.