Anuradha Vipat
परफेक्ट आयलायनर लूक मिळवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
नेहमी डोळ्याच्या आतील कोपऱ्यातून बाहेरच्या बाजूला बारीक रेषा काढत जा.
लायनर लावताना तो पापण्यांच्या अगदी मुळाशी लागेल याची काळजी घ्या, जेणेकरून डोळे नैसर्गिकरित्या मोठे दिसतील.
लायनर लावताना हात थरथरत असेल, तर कोपर टेबलावर टेकवून आधार घ्या
आयलायनर जास्त काळ टिकण्यासाठी आणि पसरू नये यासाठी डोळ्यांच्या पापण्यांवर थोडा आय प्रायमर लावा.
कन्सिलर लावल्यानंतर त्यावर थोडी लूज पावडर लावा, ज्यामुळे तेलकटपणामुळे लायनर खराब होणार नाही.
जर तुम्हाला सरळ विंग काढता येत नसेल, तर डोळ्याच्या कोपऱ्यात तिरकी सेलो टेप लावा आणि त्या रेषेवर लायनर ओढा.