Boondi Ladoo Recipe : परफेक्ट एकतारी पाकाचे प्रमाण; घरच्या घरी बनवा रसरशीत बुंदीचे लाडू

Anuradha Vipat

फराळाची शान

दिवाळीच्या फराळाची शान म्हणजेच अचूक पाकातील, मऊ आणि रसरशीत बुंदीचे लाडू.

Boondi Ladoo Recipe | agrowon

मऊ आणि रसरशीत

आम्ही दिलेल्या या रेसिपीमध्ये दिलेल्या अचूक प्रमाणामुळे तुमचे लाडू पहिल्याच प्रयत्नात हलवाईसारखे मऊ आणि रसरशीत बनतील.

Boondi Ladoo Recipe | agrowon

साहित्य

बारीक बेसन ,पाणी,साखर,पाणी ,तूप किंवा तेल,हिरवी वेलची पावडर,जायफळ पावडर,काजू आणि बदाम तुकडे,मगज बी ,केशरी खाण्याचा रंग.

Boondi Ladoo Recipe | agrowon

कृती

बेसन व्यवस्थित चाळून घ्या जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. पीठ फेटल्यामुळे बुंदी छान हलकी आणि गोल होते.

Boondi Ladoo Recipe | agrowon

बुंदी तळणे

कढईत तूप किंवा तेल चांगले गरम करून घ्या. एक बुंदीचा झारा कढईपासून ७ ते ८ इंच वर धरा. त्यावर पिठाचे पळीभर मिश्रण ओता. झारा कढईवर न आपटता पीठ आपोआप खाली पडू द्या.गॅस मध्यम ठेवून बुंदी फक्त ४० ते ५० सेकंद तळा.

Boondi Ladoo Recipe | agrowon

अचूक एकतारी पाक बनवणे

एका मोठ्या टोपात साखर आणि १ कप पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. साखर विरघळल्यावर पाकाला उकळी येऊ द्या. त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशरी रंग घाला.

Boondi Ladoo Recipe | agrowon

लाडू वळणे

तयार गरम पाकामध्ये तळलेली बुंदी, काजू-बदामचे तुकडे आणि मगज बी टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्यावर झाकण ठेवून १ ते २ तास बाजूला ठेवून द्या. या वेळेत बुंदी सर्व पाक शोषून घेते आणि छान फुगून रसरशीत होते.

Boondi Ladoo Recipe | agrowon

Tikhat Shev : शेव मऊ पडते का? मग या पद्धतीने बनवा महिनाभर कुरकुरीत राहणारी तिखट शेव

Tikhat Shev | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...