Tikhat Shev : शेव मऊ पडते का? मग या पद्धतीने बनवा महिनाभर कुरकुरीत राहणारी तिखट शेव

Anuradha Vipat

चमचमीत तिखट शेव

दिवाळीच्या फराळासाठी किंवा चहाच्या वेळेस खाण्यासाठी हलवाई स्टाईल कुरकुरीत आणि चमचमीत तिखट शेव बनवण्याची अचूक रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Tikhat Shev | agrowon

साहित्य

बेसन ,तांदळाचे पीठ,तिखट ,हळद,ओवा,हिंग,गरम तेलाचे मोहन,मीठ,पाणी,तेल.

Tikhat Shev | agrowon

कृती

ओवा मिक्सरला बारीक करून घ्या किंवा १/४ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. नंतर हे पाणी गाळणीने गाळून घ्या.

Tikhat Shev | agrowon

पीठ मळणे

बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र चाळून घ्या. त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून सुके जिन्नस मिक्स करा.आता यामध्ये २ मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला आणि चमच्याने मिक्स करा. तेल थोडे थंड झाल्यावर हाताने पिठाला चोळून घ्या.

Tikhat Shev | agrowon

१० मिनिटे झाकून ठेवा.

त्यानंतर ओव्याचे पाणी आणि थोडे-थोडे साधे पाणी घालत पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावे. मळलेल्या पिठाला वरून हलका तेलाचा हात लावून १० मिनिटे झाकून ठेवा.

Tikhat Shev | agrowon

शेव पाडणे आणि तळणे:

शेवग्याला आतून थोडे तेल लावून घ्या आणि मध्यम छिद्रांची चकती बसवा. सोऱ्यामध्ये मावेल तितके पीठ भरा. कढईत तेल चांगले गरम करून घ्या.गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि सोऱ्या गोल फिरवत गरम तेलात शेवचे २ ते ३ वेढे पाडा.

Tikhat Shev | agrowon

मध्यम आचेवर तळून घ्या.

शेव तेलात टाकल्यावर सुरुवातीला खूप बुडबुडे येतात. २ मिनिटांनी बुडबुडे थोडे कमी झाले की शेव हलक्या हाताने उलटून घ्या. दुसऱ्या बाजूनेही १-२ मिनिटे मध्यम आचेवर तळून घ्या.

Tikhat Shev | agrowon

Poha Chivda Recipe : तेलकट फराळाला म्हणा बाय! या दिवाळीत बनवा डाएट-फ्रेंडली पोह्यांचा चिवडा

Poha Chivda Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...