Aslam Abdul Shanedivan
वारंवार सर्दी-पडसे ताप आणि अशक्तपणा येत असेल तर गुळवेल फार गुणकारी ठरते.
गुळवेल ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती असून याचे वाळलेले खोड व पानाचे चूर्ण औषध म्हणून वापरले जाते
गुळवेल ज्वरनाशक असून डेंगू, चिकुन गुनिया, फ्लू, स्वाइन फ्लू इत्यादी आजारांवर उपाय आहे. तर याचे औषधाने रक्त पेशी सामान्य होतात
गुळवेलीचे सेवनाने रक्तामधील वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
संधिवात आणि वातव्याधींसह, मूळव्याध विकारांवर गुळवेल एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे.
गुळवेल संग्राहक, मूत्रजनन ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची असून रक्तसुधारक आणि पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व उपयोगी आहे.
गुळवेलीने भूक लागते, अन्न पचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.