Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरमीपासून आराम मिळावा म्हणून मठ्ठा पितात. मठ्ठा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
आरोग्यासाठी फायदेशीर असणारा मठ्ठा तयार करण्याची प्रक्रियासुध्दा विशिष्ट असते.
दुधापासून दही तयार होते, हे दही रवीने घुसळून त्यावरील लोणी काढले जाते. लोणी काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ताकापासून मठ्ठा तयार केला जातो.
ही झाली मठ्ठा तयार करण्याची प्रक्रिया, आता जाणून घेवूयात उन्हाळ्यात मठ्ठा पिण्याचे आरोग्यासाठीचे काय फायदे आहेत.
एक ग्लास मठ्ठा पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते. तसेच शरीरातील 'व्हिटामिन-सी' ची कमतरता भरून निघते.
उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचविण्यासाठी मठ्ठा खूपच फायदेशीर आहे.
याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीही मठ्ठा फायदेशीर आहे. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठीही मठ्ठा पिणे फायद्याचे आहे.