Anuradha Vipat
पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने धार्मिक, ज्योतिषीय आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात.
दररोज सकाळी सूर्योदयानंतर पाणी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी येते.
शनिवारी मुळांना जल अर्पण केल्याने शनीची साडेसातीचा त्रास कमी होतो.
पिंपळाची पूजा केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि कुंडलीतील पितृदोष दूर होण्यास मदत होते.
पिंपळ हा भगवान विष्णूंचे स्वरूप मानला जातो. याला पाणी दिल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.
पिंपळाच्या झाडाखाली बसल्याने किंवा त्याची सेवा केल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.
जल अर्पण करताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी ठरते.