Team Agrowon
थंडीच्या काळात बाजारात मोठी आवक व मागणी असलेले पीक म्हणजे वाटाणा. पुणे- गुलटेकडी येथील बाजार समिती हे वाटाण्याचे मोठे मार्केट आहे.
यंदाचा विचार केल्यास प्रतिकूल हवामान, पावसाचा परिणाम होऊन वाटाण्याची आवक कमी आहे. परिणामी, दर चांगले आहेत.
पुढील काही दिवसही हे दर असेच राहतील. त्याचा वाटाणा उत्पादकांना चांगलाच आधार मिळेल अशी स्थिती आहे.
पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये बहुतांशी फळभाज्यांची
आवक तुलनेने घटलेली असून, दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
या हंगामात नेहमीच चांगली मागणी असलेला व भाव खाणारा वाटाणाही त्यास अपवाद ठरलेला नाही.
मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रति किलो ३० ते ४० रुपये त्याचा दर असून, किरकोळ ग्राहकांना तो ४० ते ८० रुपयांप्रमाणे खरेदी करावा लागत आहे.