Pearl Millet Fodder: कमी पावसात चारा टंचाईची चिंता? बाजरी ठरेल फायदेशीर!

Swarali Pawar

पाऊस कमी, चाऱ्याची चिंता?

कमी पावसातही चांगली वाढणारी बाजरी चारा नियोजनासाठी फायदेशीर ठरू शकते. यापासून हिरवा चारा, वैरण आणि मुरघास तयार करता येतो.

Bajra Fodder Crop | Agrowon

कमी पाण्यातही बाजरी जोमात!

बाजरी हे कोरडवाहू पीक असून कमी पावसातही तग धरते. हलकी ते मध्यम आणि चांगला निचरा होणारी जमीन यासाठी योग्य आहे.

Bajra Fodder Crop | Agrowon

चाऱ्यासाठी हे वाण निवडा

जायंट बाजरा, बायफ बाजरा-१, ५ आणि ६ हे चांगले पर्याय आहेत. बहुकापणीसाठी प्रोएग्रो १, पीसीबी ९८१ आणि मोती बाजरा वापरता येतो.

Bajra Fodder Crop | Agrowon

लवकर मिळतो हिरवा चारा!

जायंट बाजऱ्याची पहिली कापणी ४० ते ४५ दिवसांनी करता येते. बायफ बाजऱ्याची कापणी साधारण ५० ते ५५ दिवसांनी करता येते.

Bajra Fodder Crop | Agrowon

पेरणीचे नियोजन असे करा

बाजरीची पेरणी २५ ते ३० सेंमी अंतरावर आणि १.५ ते २ सेंमी खोलीवर करा. हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे.

Bajra Fodder Crop | Agrowon

खत व्यवस्थापनाकडे लक्ष द्या

पेरणीपूर्वी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे आणि पेरणीवेळी ५०:३०:३० किलो नत्र, स्फुरद, पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने ३० किलो नत्र द्यावे.

Bajra Fodder Crop | Agrowon

फुलोऱ्याच्या आसपास कापणी करा

चाऱ्यासाठी पीक फुलोऱ्याच्या आसपास असताना कापणी केल्यास चांगली गुणवत्ता मिळते. बहुकापणीच्या वाणांची पुढील कापणी साधारण ३० दिवसांनी करता येते.

Bajra Fodder Crop | Agrowon

फक्त बाजरीचा चारा देऊ नका!

जनावरांना बाजरीसोबत कोरडा आणि डाळवर्गीय चारा देऊन संतुलित आहार द्या. चारा टंचाईच्या काळात बाजरीसोबत चवळीचाही पर्याय वापरता येतो.

Bajra Fodder Crop | Agrowon

Vegetable Crop Pests: भाजीपाला पिकावर रसशोषक किडींचा हल्ला? करा हे उपाय!

Agrowon
अधिक माहितीसाठी..