Swarali Pawar
पावसाचा खंड पडल्याने भाजीपाला पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतोय. भेंडी, वांगी, मिरची, कांदा आणि बटाट्याची नियमित पाहणी करा.
मावा, तुडतुडे आणि फुलकिडींसाठी इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी १ ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यूजी २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरा. प्रत्येक पानावर १ ते २ तुडतुडे किंवा ५ ते १० पांढऱ्या माशा दिसल्यास फवारणीचा विचार करा.
तुडतुड्यांसाठी सायपरमेथ्रीन २५ ईसी ४ मिलि किंवा फ्लोनिकॅमिड ७० डब्ल्यूजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरा. फवारणी करण्यापूर्वी पावसाची उघडीप नक्की पाहा.
वांग्यात पांढरी माशी दिसत असल्यास एकरी २० ते २५ पिवळे चिकट सापळे लावा. सोबत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी अधूनमधून करा.
कांद्यावर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून सुरुवातीला नियंत्रण करा. प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिलि प्रति १० लिटर पाणी वापरा.
मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे रोखण्यासाठी एकरी १५ पिवळे चिकट सापळे लावा. प्रादुर्भाव दिसल्यास फ्लोनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारता येते.
पाऊस झाल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे पावसाची शक्यता असल्यास घाईने कीटकनाशकाची फवारणी करू नका.
चिकट सापळे, निंबोळी अर्क आणि नियमित पाहणीला प्राधान्य द्या. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यासच पिकानुसार शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करा.