Anuradha Vipat
शेंगदाणे किंवा इतर शेंगा सोलणे हे कष्टाचे काम वाटू शकते पण खालील सोप्या ट्रिक्स वापरल्यास तुमचे काम काही मिनिटांत होईल.
शेंगदाणे भाजून घेतल्यावर ते एका सुती रुमालात गुंडाळा. रुमालाचे तोंड घट्ट धरून तो हाताने चोळा किंवा थोडा आपटा. यामुळे शेंगदाण्याची टरफले वेगळी होतात .
वाळलेल्या शेंगा एका ताटात पसरवा आणि त्यावर हलक्या हाताने लाटणे फिरवा. यामुळे शेंगांचे कवच तडकते आणि दाणे सहज बाहेर येतात.
जर शेंगा खूप निबर असतील, तर त्या थोडा वेळ कोमट पाण्यात भिजत घाला. यामुळे त्यांचे कवच मऊ होते आणि सोलणे सोपे जाते.
छिद्रे असलेला तळण्याच्या झार्यात शेंगदाणे घेऊन हलवल्यास टरफले छिद्रांमधून खाली पडतील आणि स्वच्छ शेंगदाणे वर राहतील.
शेंगा मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मिक्सर एका सेकंदासाठी 'पल्स मोड'वर फिरवा यामुळे शेंगा सोलल्या जातील.