Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहाराकडे द्या विशेष लक्ष

Mahesh Gaikwad

शेळ्यांचा आहार

उन्हाचा कडाका वाढल्याने शेळ्यांना देखील उष्णेतेचा त्रास होतो. अशावेळी शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.

Goat Farming | Agrowon

आहार व्यवस्थापन

उन्हाळ्याच्या दिवसांत शेळ्यांना झाडपाल्याची जास्त प्रमाणात गरज असते. दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची गरज असते.

Goat Farming | Agrowon

हिरवा चारा

शेळीला तिच्या वजनाच्या चार ते पाच टक्के शुष्क पदार्थांची गरज असते. सुक्या आणि हिरव्या चाऱ्यातून हे शुष्क पदार्थ मिळतात.

Goat Farming | Agrowon

वाळलेला चारा

शेळीच्या आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांचे आरोग्य

याशिवाय हिरव्या चाऱ्यासाठी सुबाभूळ, शेवरी, गिनी गवत, अंजन वृक्ष, मारवेल या सारखा हिरवा चारा द्यावा.

Goat Farming | Agrowon

मांस उत्पादन

शेळ्यांच्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते.

Goat Farming | Agrowon

सावलीत बांधावे

चरून आल्यावर शेळ्यांना सावलीत बांधावे. उन्हाळ्यात शक्यतो शेळ्यांना गोठ्यातच चारा खायला द्यावा.

Goat Farming | Agrowon

पुरेसे पाणी द्यावे

शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी द्यावे. शेळ्यांना गरजेनुसार २४ तास पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी.

Goat Farming | Agrowon