Ice Facial : चेहऱ्यावर बर्फ लावण्याआधी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

Mahesh Gaikwad

आईस फेशिअल

सध्या चेहऱ्यासाठी बर्फाच्या फेशिअलचा ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ice Facial | Agrowon

बर्फाचा मसाज

चेहऱ्यावरील तेलकटपणा, काळपटपणा, काळे डाग आणि मुरूम घालविण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाचा मसाज करतात.

Ice Facial | Agrowon

मेकअप टिकतो

चेहऱ्यावर मेकअप करण्याआधी बर्फ लावल्यास केलेला मेकअप दिर्घकाळ टिकण्यास मदत होते.

Ice Facial | Agrowon

त्वचेच्या समस्या

पण चेहऱ्यावर बर्फ लावण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. नाहीतर चेहऱ्याच्या त्वचेला समस्या उद्भविण्याची शक्यता असते

Ice Facial | Agrowon

कपड्यात गुंडाळून लावा

चेहऱ्यावर थेट बर्फ लावल्यास अतिथंडपणामुळे चेहरा जळण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर थेट बर्फ लावण्याऐवजी कापडामध्ये गुंडाळून बर्फ लावावा.

Ice Facial | Agrowon

त्वचेची अॅलर्जी

संवेदनशील त्वचा असल्यास चेहऱ्यावर बर्फ लावल्यास रॅशेस, अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

Ice Facial | Agrowon

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्यावर बर्फ लावल्यास त्वचा अजूनच कोरडी होण्याची शक्यता असते. जरी बर्फ लावला तरी त्यानंतर मॉइश्चूरायझर लावावे.

Ice Facial | Agrowon

ओचेहऱ्यावरील सुरकुत्या

बर्फ लावल्याने चेहऱ्यावरी सुरकुत्या कमी होतात. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Ice Facial | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....