Anuradha Vipat
पॅरालिसिसचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे शरीराच्या एका बाजूचा भाग, हात किंवा पाय अचानक बधीर होणे आणि हालचाल बंद होणे होय.
हा त्रास मेंदूला होणारा रक्ताभिसरणाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा ब्रेन हॅमरेजमुळे होतो.
व्यक्तीला हसण्यास सांगा. चेहरा एका बाजूला वाकडा होतो किंवा डोळे, ओठ एका बाजूला झुकतात.
व्यक्तीला दोन्ही हात वर करण्यास सांगा. एका बाजूचा हात वर उचलण्यास त्रास होतो किंवा तो आपोआप खाली पडतो.
व्यक्तीला एक साधे वाक्य बोलण्यास सांगा. त्यांचे शब्द अडखळतात, जीभ जड होते किंवा ते स्पष्ट बोलू शकत नाहीत.
रुग्णाला सीटी स्कॅन आणि एमआरआयची सुविधा असलेल्या जवळच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा.
रुग्णाला एका कुशीवर झोपवा, जेणेकरून तोंडातील लाळ किंवा उलटी श्वसननलिकेत जाणार नाही.