Diwali DIY Handmade Crafts : कागदाची किमया! दिवाळीसाठी घरीच बनवा या आकर्षक हँडमेड वस्तू

Anuradha Vipat

कागदाच्या वस्तू

दिवाळीमध्ये रेडीमेड वस्तू विकत आणण्याऐवजी स्वतःच्या हाताने बनवलेल्या कागदाच्या वस्तू वापरून घर सजवण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

अत्यंत आकर्षक

कागदापासून बनवलेले डेकोरेशन बजेट-फ्रेंडली तर असतेच, शिवाय ते पर्यावरणाला पूरक आणि दिसायला अत्यंत आकर्षक असते.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

आकाशकंदील

वेगवेगळ्या रंगांचे 'क्रॉफ्ट पेपर' किंवा 'जिलेटिन पेपर' घ्या. एका चौकोनी कागदाला मधोमध दुमडून त्याला बारीक पट्ट्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर कागद उघडून त्याचे दोन्ही टोकं एकत्र चिकटवा. खाली जिलेटिन पेपरच्या रंगीत पट्ट्या लावा.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

कागदी दिवे आणि पणत्या

तांबड्या, पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या कागदाचे पंख्यासारखे घड्या घाला. त्याला अर्धवर्तुळाकार आकार देऊन दिव्याचा बेस तयार करा. वरच्या बाजूला पिवळ्या किंवा केशर रंगाच्या कागदाची ज्योत कापून चिकटवा.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

कागदी फुलांचे तोरण

पिवळ्या आणि नारंगी रंगाचे 'क्रेप पेपर' किंवा टिशू पेपर घ्या. त्याचे गोल कापून एकावर एक ठेवा आणि मध्यभागी स्टेपल करा. नंतर कागदाच्या कडा हाताने थोडे चुरगळून फुलाचा आकार द्या. हिरव्या कागदाची पाने बनवून ही फुले एका धाग्यात ओवून घ्या.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

डी वॉल हँगिंग

रंगीत कार्डस्टॉक पेपरपासून वेगवेगळ्या आकाराचे कट-आऊट्स तयार करा. त्यांना थोडे दुमडून ३डी लूक द्या. एका सुबक पट्टीला किंवा लाकडी काडीला हे कट-आऊट्स वेगवेगळ्या लांबीच्या दोऱ्यांनी लटकवा.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

पेपर कप लाईट्स माळ

पांढरे किंवा रंगीत पेपर कप घ्या. त्यावर चमकणारे पेंट्स, मणी किंवा ग्लिटर लावा. कपच्या मागच्या बाजूला एक लहान छिद्र करा. बाजारात मिळणाऱ्या साध्या एलईडी फेअरी लाईटचा एक-एक बल्ब या छिद्रामधून आत टाका.

Diwali DIY Handmade Crafts | agrowon

Stunning Diwali Balcony : दिवाळीत बाल्कनी चमकेल सोन्यासारखी! ट्राय करा या भन्नाट लायटिंग आयडियाज

Stunning Diwali Balcony | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...