Anuradha Vipat
दिवाळीमध्ये घराची बाल्कनी आकर्षक करण्यासाठी LED स्ट्रिप लाइट्स, हँगिंग कंदील आणि पारंपारिक पणत्यांचे कॉम्बिनेशन सर्वोत्तम मानले जाते.
बाल्कनी लहान असो वा मोठी, योग्य लायटिंगमुळे तिचा लूक पूर्णपणे बदलू शकतो.
बाल्कनीच्या लोखंडी किंवा काचेच्या रेलिंगभोवती पिवळ्या रंगाचे फेअरी लाइट्स गुंडाळा.
जर बाल्कनीला वरच्या बाजूला आडोसा असेल, तर तिथून खाली रेंगाळणारे एलईडी कर्टन लाइट्स लावा.
बाल्कनीच्या अगदी मध्यभागी किंवा एका कोपऱ्यात सुंदर कागदी, कापडी किंवा काचेचा आकाशकंदील लटकवा.
जर तुम्हाला आधुनिक लूक हवा असेल, तर बांबू किंवा ज्यूटपासून बनवलेले हँगिंग कंदील वापरा.
बाल्कनीच्या कोपऱ्यात किंवा खिडकीच्या कडेला वाऱ्यामुळे पणत्या विझू नयेत म्हणून वॉटर-सेन्सर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या एलईडी पणत्या वापरा.