Anuradha Vipat
पपईच्या बिया आपण कचरा समजून फेकून देतो, पण त्या खरंतर आरोग्यासाठी एक 'सुपरफूड' आहेत.
पपईच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
या बिया प्रथिने पचवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते.
पपईच्या बियांमध्ये 'कार्पेन' नावाचे घटक असते, जे पोटातील परजीवी आणि जंत नैसर्गिकरित्या नष्ट करण्यास मदत करते.
या बिया लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर टाकून लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
यात भरपूर फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
या बिया रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात.