Anuradha Vipat
मोहरीचं तेल भारतीय स्वयंपाकघरात वर्षानुवर्षे वापरले जात आहे. आयुर्वेदात याला 'औषधी तेल' मानले जाते.
यात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स योग्य प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा आणि केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी हे उत्तम आहे.
अन्नामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने भूक वाढते आणि पचनशक्ती सुधारते.
कोमट मोहरीच्या तेलाने छातीवर मालिश केल्याने कफ आणि श्वसनाचा त्रास कमी होतो
मोहरीच्या तेलात युरूसिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. याचे अतिसेवन हृदयाच्या स्नायूंसाठी घातक ठरू शकते
काही लोकांच्या त्वचेला हे तेल लावल्याने खाज, पुरळ किंवा जळजळ होऊ शकते