Aslam Abdul Shanedivan
पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून याच्या सेवनाने अनेक आजारापासून सूटका होते
पपई जितके लाभकारी आहे तितक्याच पपईच्या बिया देखील खूप फायदेशीर असतात
पपईच्या बियांमध्ये असलेले एन्झाईम्स पचनसंस्था निरोगी बनवून पोटाशी संबंधित अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या समस्या दूर करते.
पपईच्या बियांचे नियमित सेवन केल्यास यकृत डिटॉक्स करण्यास मदत होते
अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावत असते. अशा वेळी पपईच्या बिया शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही उपयुक्त ठरतात. यामुळे वजन कमी होते
पपईच्या बिया फेकून देण्याऐवजी त्या साठवता येतात. यासाठी त्या प्रथम स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळून हवाबंद डब्यात साठवता येते.
पपईच्या बियांची पूड करून ती स्मूदी, सॅलड किंवा दह्यामध्ये मिसळून सेवन करू शकता. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)