Aslam Abdul Shanedivan
पपईच्या फायद्यांबाबत अनेकांना माहिती आहे. मात्र पपईच्या दुधाचे फायदेही आहेत असे कृषी तज्ज्ञ सांगतात.
पपईच्या दुधापासून पपेन तयार करता येतो. यावर अखिल भारतीय फळ संशोधन संस्था आणि डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ काम करत आहे.
पपेनचा वापर हा औषधांपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये केला जातो.
सध्या एक हेक्टरमध्ये पपई लागवडीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. आठ ते दहा लाखांची फळे निघतात.
पण हेच पपेन उत्पादनासाठी प्रयत्न केल्यास एका हेक्टरमधून अडीच ते तीनशे लिटर पपई दूध काढता येते. ज्याची बाजारात किंमत १५० रुपये प्रति लिटर आहे.
पॅपेन काढण्यासाठी, तीन महिन्यांच्या फळावर सुमारे 3 मिमी खोलीचे ४-५ चीरे केले जातात. यातून निघणारा चीक हा मातीच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात गोळा केले जाते.
तज्ज्ञांच्या मते, पपेन हे पाचक एंझाइम आहे. पोटात व्रण, जुलाब, इसब, यकृत रोगांवरील उपचार करण्यासाठी पॅपेनचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो.