Anuradha Vipat
आज आपण पाहूयात ढाबा स्टाइल पनीर मसाला कसा बनवायचा.पनीर मसाला हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.
तूप , पनीर, जिरे, तेज पत्ता, दालचिनी, कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो प्यूरी, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ, दही, गरम मसाला, कसूरी मेथी,पाणी.
तूप गरम करा आणि पनीरचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळा. तुपात जिरे, तेज पत्ता आणि दालचिनी घाला आणि सुगंधित होईपर्यंत परतून घ्या.
कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला आणि कांदा मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो प्यूरी घाला. हळद, लाल मिर्च पावडर, धणे पावडर, जिरे पावडर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
मिश्रणात फेटलेली दही घाला .तळलेले पनीर ग्रेवीमध्ये मिक्स करा आणि 2-3 मिनिटे शिजवा.
पनीर ग्रेवीमध्ये गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून चांगले मिक्स करा.
गरम रोटी किंवा भाताबरोबर ढाबा स्टाईल पनीर मसाला गरम गरम खा.