sandeep Shirguppe
पनीर आणि टोफूमध्ये पोषकतत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु, अनेकदा लोक पनीर आणि टोफूला एकच समजतात.
प्रत्यक्षात पनीर हे दुधापासून बनवले जाते तर टोफू हे सोयापासून बनवले जाते.
पनीरमध्ये कॅल्शिअम अन् जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात तर टोफूमध्ये व्हिटॅमीन बी १ आणि अॅमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते.
आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या टोफूचा आहारात समावेश केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.
टोफू हे एक संपूर्ण प्रथिने आहे. टोफूमध्ये अॅमिनो अॅसिड्स असतात, ज्यामुळे शरीराला काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते.
कर्करोगासाठी आणि इतर आजारांना दूर करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या टोफूचा आहारात जरूर समावेश करा.
टोफूमध्ये मॅंगनीज, फॉस्फरस आणि लोहाचे भरपूर प्रमाण आढळते. यासोबतच कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून ही टोफूला ओळखले जाते.
टोफूमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते.