sandeep Shirguppe
पूर्वी जखम अथवा मुक्कामार लागल्यावर आंबेहळदीचा वापर केला जायचा, या हळदीचे अनेक फायदे आहेत.
मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.
जर रक्त गोठले असेल तर रक्ताचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी. आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त गोठलेल्या जागेवर लावावी.
शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा.
आंबेहळदीमुळे पाठीवर तसेच अंगावरील पूरळ दूर होतात.
आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्याचा रंग उजळतो.
दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.
सध्या बाजारातून आंबेहळद कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषध मलमांनी घेतली.