Palas Flower Treasure Herbal Tea : ‘ग्रीन टी’ ला पर्याय पळस फुलांचा ट्रेझर हर्बल चहा

Team Agrowon

पळस वृक्षाच्या आकर्षक नारिंगी फुलांमुळे जंगलातील ज्वाला म्हणून ओळखले जाते. याची पाने, फुले विविध औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात. दरवर्षी पळसाला फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये फुले लागतात.

Palas Flower Processing | Agrowon

पळस फुलांवरील प्रक्रियेतून आर्थिक फायदा होऊ शकतो का ? याबाबत यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र सातभाई यांनी संशोधन केले.

Palas Flower Processing | Agrowon

संशोधन प्रकल्पामध्ये पळस फुलांचा वापर करून ‘ट्रेझर हर्बल’ चहा तसेच काढायुक्त पेय तयार करण्यात आले. हा चहा ‘ग्रीन टी’ साठी एक उत्तम पर्याय आहे. पळस फुलांचा चहा आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त आहे. यामध्ये नैसर्गिक गोडसरपणा आहे.

Palas Flower Processing | Agrowon

पळस हर्बल चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅवोनॉइड्स आहेत. हे घटक पचन सुधारणा, ताण तसेच रक्तात वाढलेली साखर कमी करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Palas Flower Processing | Agrowon

पळस फुलांच्या बरोबरीने इतर घटक वापरून चार प्रकारचा चहा तयार करण्यात आला आहे. आकर्षक पाउचमध्ये डीप प्रकारामध्ये चहा उपलब्ध आहे. पाणी गरम करून त्यामध्ये पाच मिनिटे ट्रेझर हर्बल चहाचे डीप सॅचे बुडवावेत. त्यानंतर या चहाचा आस्वाद घेता येतो.

Palas Flower Processing | Agrowon

हर्बल पेय निर्मिती प्रक्रिया पाकिटावर चित्रामार्फत दाखविण्यात आली आहे. हे पेय गरम किंवा गार झाल्यावर प्यायले तरी चालते. यामध्ये साखर आणि दूध मिसळण्याची गरज नाही.

Palas Flower Processing | Agrowon

सरबत २०० मिलि प्लॅस्टिक (पेट बाटली) बाटलीमध्ये पॅक केले आहे. हे तयार करताना अन्न सुरक्षेची मानके पाळण्यात आली आहेत.

Palas Flower Processing | Agrowon

Frampond Management : शेततळं खोदताना जागेची निवड कशी कराल?

आणखी पाहा...