Team Agrowon
जिरायती जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी हे जास्त प्रमाणात वाहून जातं. असे हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी शेततळे फायदेशीर ठरते.
पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी, काळी चिकन मातीचे प्रमाण जास्त असलेली जमीन शेततळे खोदण्यासाठ निवडावी.
साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी. मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळे खोदण्यासाठी निवडू नये.
खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी. तसेच आजूबाजूच सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्रित येईल अशाप्रकारे शेततळ्याच नियोजन कराव.
पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा शेततळे खदण्यासाठी निवडू नये. कारण अशा जागेतील तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदाव.
याशिवाय शेततळ्यामध्ये करायचा पाणीसाठा अपधावेतून उपलब्ध होण्यासाठी संबंधित तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाचा विचार करावा. .
पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक किंवा तुषार पद्धतीने पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते.