Anuradha Vipat
कानाच्या मागे सतत दुखणे ही समस्या साधी असू शकते किंवा एखाद्या संसर्गाचे लक्षणही असू शकते.
कानाच्या मागे असलेल्या 'मॅस्टोइड' हाडाला संसर्ग झाल्यास तीव्र वेदना होतात. हे सहसा मध्यकर्णाच्या संसर्गामुळे होते.
शरीरात इन्फेक्शन असल्यास कानाच्या मागे असलेल्या गाठींना सूज येते, ज्यामुळे स्पर्श केल्यावर किंवा सतत दुखू शकते.
अक्कलदाढ येत असताना किंवा दातात संसर्ग असल्यास त्याचा त्रास कानापर्यंत पोहोचतो.
मऊ कापड कोमट पाण्यात भिजवून किंवा हीटिंग पॅडने कानाच्या मागे हलका शेक द्यावा. यामुळे रक्तभिसरण वाढून वेदना कमी होतात.
ताणामुळे किंवा चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे दुखत असल्यास मानेचे हलके व्यायाम करावेत.
कोमट खोबरेल तेलात चिमूटभर कापूर टाकून कानाच्या मागे हलक्या हाताने मसाज करा