Eggs Side Effects : सावधान! ‘संडे हो या मंडे जास्त खाऊ नका अंडे’; जास्त अंडी खाल्याने ‘हे’ होईल

Aslam Abdul Shanedivan

एक चांगली म्हण

आपल्याकडे एक चांगली म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, पण सध्या अंड्यांच्या बाबतीत हे उलटेच होताना दिसत आहे.

Eggs Side Effects | agrowon

अंड्याचे अतिसेवन

आरोग्य तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा असे म्हणतात. मात्र अंड्यांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत.

Eggs Side Effects | agrowon

फायदा

अंडी खाल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होतेच त्याचबरोबर अंगदुखी दूर होऊन स्मरणशक्ती वाढते.

Eggs Side Effects | agrowon

विपरीत परिणाम

जर तुम्ही दररोज अंडी अमर्यादित प्रमाणात खात असाल तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यातून अनेक आजार जन्माला येतात.

Eggs Side Effects | agrowon

कोणते आजार?

एका दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाणे आरोग्यासाठी चांगलं नाही. एका अंड्यामध्ये 75 कॅलरीज असतात, त्यामुळे 2 अंड्याचे सेवन केल्यास 150 कॅलरीज मिळतात. पण यापेक्षा जास्त अंडी खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो

Eggs Side Effects | agrowon

कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त

अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. जे हृदयासाठी चांगलं नाही

Eggs Side Effects | agrowon

मधुमेहाच्या रुग्णांनीही टाळावे

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनीही अंडी खाऊ नयेत. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अंड्यातील पिवळा भाग अजिबात खाऊ नये

Eggs Side Effects | agrowon

Subsidy on Tea Farming : असं कोणतं सरकार आहे जे चहा शेतकऱ्यांना ५० % अनुदान देतयं?