sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील दुष्काळी वाझर गावच्या रूपाली शिवाजी होवाळ यांनी दुष्काळावर मात करत शेतीचे उत्तम नियोजन केलं आहे.
कित्येक वर्षांपासून पडीक असलेली शेती रुपाली ताईंनी लागवडीखाली आणण्याचे नियोजन केले.
आजोबांच्या नंतर तब्बल २६ वर्षे शेती तशीच पडून असल्यामुळे झाडेझुडपे वाढली होती. पहिले सहा महिने शेत जमीन व्यवस्थित करण्यात गेली.
२०१६ पासून त्यांनी भुईमूग, मूग, चवळी लागवडीवर भर दिला. पीक व्यवस्थापनाचा आत्मविश्वास आल्याने शाश्वत पाण्यासाठी विहीर खोदली.
उसामध्ये भुईमूग, मूग, चवळी ही आंतरपिके घेतली जातात. त्यातून मिळणारे उत्पादन घरी खाण्यापुरते ठेवून उर्वरित शेतीमालाची विक्री केली जाते.
भाजीपाला पीकदेखील महत्त्वाचे समजून बाजारपेठेतील भाजीपाल्याच्या आवकेचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केले आहे.
बाजारपेठेचा विचार करूनच यंदा मार्चमध्ये दहा गुंठे क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली आहे. त्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑगस्ट महिन्यात घेवडा लागवड केली जाते.
शेती नियोजनाची सूत्रे प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने ऊस, भाजीपाला लागवड, व्यवस्थापन. शिवारफेरीमध्ये सहभाग.