sandeep Shirguppe
गुळाचा चहा घेण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. गुळ खाल्ल्याने अनेक आजारांना आळा बसतो.
मायग्रेन हा गंभीर डोकेदुखीचा आजार आहे. यावर आराम मिळवण्यासाठी गुळाच्या चहाचे सेवन नियमीत केल्यास फायदा होतो.
चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना पोट फुगीच्या समस्येवर मात करण्यासाठी गुळचा चहा पिणे लाभदायक ठरू शकते.
तुम्हाला शुगर असेल तरीही तुम्ही गुळाच्या चहाचे सेवन करू शकता परंतु अति सेवन करू नये.
हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो.
गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.
गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गूळ खाण्यानं भूकही वाढते.