Ova Health Benefits : फक्त पोटाच्याच नाही तर अनेक आजारावर उपयोगी महाऔषधी ओवा

Team Agrowon

स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक पदार्थांना चव आणण्यासाठी ओव्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. ओवा औषधी म्हणूनही उत्तम कार्य करतो.

Ova Water Eating | agrowon

वातूळ पदार्थ, अवेळी जेवण या कारणांनी पोटात गॅसेस होतात आणि पोट दुखते. अशावेळी ओव्याचे ३-४ दाणे चावून खावेत आणि गरम पाणी प्यावे.

Ova Health Benefits | agrowon

बऱ्याच वेळा भूक चांगली लागते. पण थोडे अन्न सेवन केले तरी पोट जड होऊन ढेकर येतात. अशा वेळी जेवणानंतर ओवा खावा.

Ova Health Benefits | agrowon

लहान मुलांना जास्त गोड खाण्यामुळे किंवा अन्य कारणांनी जंत होतात. त्यासाठी ओवा आणि सैंधव यांचे मिश्रण करून द्यावे.

Ova Health Benefits | agrowon

काही लोकांना पोटात गॅसेस होणे, पचनशक्ती मंदावणे असे त्रास वारंवार होतात. अशावेळी ओवा, जिरे, हळीव आणि मेथी दाणे समभाग घेऊन मिक्‍सरमधून बारीक करावे. तयार पावडर अर्धा चमचा प्रमाणात गरम पाण्यासह जेवणानंतर घ्यावी.

Ova Health Benefits | agrowon

सर्दी झाल्यास ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे. शिवाय त्याचा वास घ्यावा.

Ova Health Benefits | Agrowon

मळमळणे, उलटीचा त्रास, तोंडाला पाणी सुटणे यासाठी ओवा पावडर आणि लवंग पावडर पाव चमचा प्रमाणात मधासह घ्यावी.

Ova Health Benefits | agrowon

Summer Drinks : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देण्यासाठी विविध सरबतांचे प्रकार ; ट्राय तर करुन बघा

आणखी पाहा...