Drone Technology Certificate Course : ‘वनामकृवि’ मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी

Team Agrowon

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील नाहेप केंद्राद्वारे ६ महिने कालवधीचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वर्धापनदिनी शनिवारी (ता. १८) सुरू होत आहे.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

पुणे येथील सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स या संस्थेसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

रिमोट पायलट लायसन्सधारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून, अभ्यासक्रमातील कृषिविषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, या अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गुगल फॉर्मद्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय आदी सारख्या क्षेत्रात नोकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो.

Agricultural Drone Technology Certificate Course | Agrowon

Animal Care : अशी ओळखा जनावरांतील धनुर्वाताची लक्षणे